शांतिनाथ जैन मंदिर रामटेक जवळील दयोदय गोशाळा रामटेक येथे पशुंसाठी आवश्यक व्यवस्थेचा अभाव असून पशुंची व्यवस्थित काळजी घेतली जात नसून त्यांची हेडसांड होत असल्याचा आरोप बजरंग दलाचे गोरक्षक विवेक शुक्ला यांनी गौशाळा प्रबंधकावर केला. बुधवार दि. 21 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान त्यांनी या गौशाळेला अचानक भेट देऊन पाहणी केली. उल्लेखनीय म्हणजे याच गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने अवैध वाहतूक करणारे काही पशु पकडून येथे चारापाणी दाना व्यवस्थित मिळून सुरक्षित राहावे म्हणून ठेवलेले आहेत.