कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा बँक लिपिक भरती मध्ये सत्ताधाऱ्यांकडून स्थानिक तरुण-तरुणींची लूटमार : माजी आम.वैभव नाईक
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लिपिक पदासाठी ७३ जागांची भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या बँकेतील भाजप पक्षाच्या सत्ताधाऱ्यांकडून स्थानिक तरुण-तरुणींची मोठ्या प्रमाणात लूटमार आणि फसवणूक करण्यात येत आहे असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी आज गुरुवार १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता कणकवली येथे पत्रकारांशी बोलताना केला.