अकोट: नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप पार पडले;जाहीर प्रचाराला जढणार जोर
Akot, Akola | Nov 26, 2025 अकोट नगरपालिका निवडणुकीतील 35 नगरसेवक पदासह नगराध्यक्ष निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना आज बुधवारी निवडणूक चिन्ह वाटप झाल्याने खऱ्या अर्थाने आता निवडणूक प्रचार रंगणार आहे. 26 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या निवडणूक चिन्ह वाटप प्रक्रियेमुळे जाहीर प्रचाराला जोर चढणार आहे.येत्या 30 तारखे पर्यंत जाहीर प्रचाराचे युद्ध रंगणार आहे.तर निवडणुक चिन्हांमध्ये भाजप-कमळ,वंचित सिलेंडर काँग्रेस पंजा राष्ट्रवादी अजित पवार गट घड्याळ शिंदेसेना धनुष्यबाण उबाठा मशाल एमआयएमल पतंग चिन्ह मिळाले आहे.