जालना जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेले विद्यार्थी पक्षीमित्र संमेलन कन्हैया नगर येथील वन प्रशिक्षण विद्यालयात उत्साहात पार पडले. बुधवार दि. 11 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 दरम्यान सामाजिक वनीकरण विभाग आणि पक्षीमित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनात जिल्ह्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग, पर्यावरण आणि पक्षीजगताबद्दल जागर निर्माण करण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.