गडचिरोली: अहेरी येथील मुख्य चौकात शहीद विर बाबूराव शेडमाके यांच्या स्मारकाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले लोकार्पण
अहेरीच्या मुख्य चौकात 9 आगष्ट जागतिक आदिवासी दिनाच्या शुभपर्वावर शहीद विर बाबुराव शेडमाके यांच्या स्मारकाचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी आज लोकार्पण केले आणि स्मारकाला अभिवादन व स्मरण करून जागतिक आदिवासी दिनाचे सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी अहेरी परिसरातील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते