नागपूर हिवाळी अधिवेशनावरून परतल्यानंतर शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी रायगडच्या राजकारणात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार सुनील तटकरे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांच्यावर त्यांनी थेट आणि तीव्र शब्दांत टीका केली. कॅशबॉम्ब, सुपारी राजकारण, उतरती कळा आणि पालकमंत्रीपद अशा मुद्द्यांवरून दळवी यांनी दोघांवरही हल्लाबोल केला आहे.