जाफराबाद: पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदाराला ठाणे आमलदराने लावले हाकलून, व्हिडिओ महोरा गाव परिसरात व्हायरल
आज दिनांक 3 नोव्हेंबर 2025 वार सोमवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरासह माहोरा गाव व परिसरात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे तो व्हिडिओ म्हणजे जाफराबाद पोलीस ठाणे येथे काल दिनांक 2 नोव्हेंबर 2025 वार रविवार रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास तक्रार देण्यासाठी आलेल्या एका तक्रारदाराला ठाणे अंमलदार मोरे यांनी हाकलून लावत पोलीस ठाण्याचे गेट लावून घेतले आहे व हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.