पैठण: अज्ञात वाहनाच्या धडकेत नीलगाय जागीच ठार दावरवाडी शिवारातील घटना
*पैठण ते पाचोड मुख्य रोडवरील दावरवाडी शिवारातील एच. पी पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने नील गाईस जोराची धडक दिल्याने तिचा जागीच मृत्य झाल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली.याप्रकरणी घटना घडल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला दरम्यान या परिसरातअधून मधून वन्य प्राण्यांना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांची धडक बसून अनेक वन्य प्राणी जखमी होऊन गतप्राण होतअसल्याच्या घटना घडत आहेत नील गाईचा वाहनाच्या धडकेत मृत्यू