घाटंजी: तालुक्यात केंद्रप्रमुखाची नियुक्ती तरीही कारभार प्रभारीकडे
घाटंजी तालुक्यात गेल्या चार वर्षापासून केंद्रप्रमुखांचा प्रभारी कारभार सुरू होता. आता मात्र जिल्हा परिषद च्या शिक्षण विभागाने मागील महिन्यात केंद्रप्रमुखांची नियुक्ती केली.असे असताना देखील शिक्षकांकडे असलेला प्रभार काढला नाही.केंद्रप्रमुखांची नियुक्ती तरीही केंद्रप्रमुखांचा कारभार प्रभारी यांच्याकडे सुरू असल्याने घाटंजीच्या शैक्षणिक विभागाचा कारभार चर्चेमध्ये आला आहे.