यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑटोमोटिव्ह चौकाजवळ झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात मोहम्मद जमील मोहम्मद आरिफ अंसारी यांचा मृत्यू झाला आहे.७ मार्च रोजी रात्री १०:२० च्या सुमारास, फिर्यादी जुबेदा फातिमा त्यांच्या पती व १३ वर्षांच्या मुलासह ॲक्टिव्हा मोपेडने बहिणीकडे जात होत्या. मेट्रो स्टेशनजवळील पाडे वस्तीकडे वळण घेत असताना, कामठीकडून वेगाने आलेल्या पल्सर चालकाने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.या अपघातात तिघेही जखमी झाले होते.