खुलताबाद: खुलताबाद नगरपरिषद निवडणुकीसाठी 19 मतदान केंद्र निश्चित; अचारसंहिता व सुव्यवस्था बैठकीत मार्गदर्शक सूचना
नगरपरिषद निवडणुकीच्या अनुशंगाने शहरातील 10 प्रभागांसाठी एकूण 19 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. अचारसंहिता अंमलबजावणी व निवडणूक सुव्यवस्थेबाबतची बैठक शनिवारी नगरपरिषद सभागृहात घेण्यात आली. प्रशासक तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी समीर शेख यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली.शहरातील एकूण मतदारसंख्या 14,775 असून यात 7,351 पुरुष व 7,424 महिला मतदारांचा समावेश आहे. नगराध्यक्ष पदासाठी खर्च मर्यादा 7.50 लाख, तर नगरसेवक पदासाठी 2.50 लाख रुपये निश्चित करण्यात आली