वाशिम: विलंबित जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रियेत काटेकोरपणे विहीत मुदतीत काम करावे, जिल्हाधिकारी कुंभेजकर
Washim, Washim | Sep 30, 2025 विलंबित जन्म-मृत्यू नोंदणी प्रकरणात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व काटेकोरपणे विहीत मुदतीत काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात विलंबित जन्म व मृत्यू नोंदणीबाबत आढावा बैठक दिल्याची माहिती दि. 30 सप्टेंबर रोजी देण्यात आली. या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोंद्रे आदी अधिकारी उपस्थित होते.