हिंगणघाट: गांज्याची विक्री करीता वाहतुक करणाऱ्या चंद्रपूर येथील महिलेला जाम बस स्थानक परीसरात अटक:८ किलो ३८७ ग्रॅम गांजा जप्त
जाम बस स्थानक परीसरात चंद्रपूर येथील महिलेला वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांज्याची विक्री करीता वाहतुक करताना अटक करून तिच्या ताब्यातून १ लाख ९९ हजार ४२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. प्राप्त माहितीनुसार वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना पथकाला चंद्रपूर येथील महिला गांज्याची वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पथकाने जाम बस स्थानक परीसरात सापडा रचून रेष्मा मुस्तफा शेख, वय 43 वर्ष, राहणार चंद्रपुर हिला ताब्यात घेऊन गांजा जप्त केला