नेवासा: भाव पडल्याने शेतकऱ्यांची दिवाळी निराशेच्या छायेत
दिवाळीच्या सणाला लक्ष्मीपूजनासाठी केशरी आणि पिवळ्या झेंडूच्या फुलांची पूजेसाठी, हार करण्यासाठी मोठी मागणी असते त्यामुळे झेंडू फुलांना चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना होती, पण यावर्षी अपेक्षित बाजारभाव मिळाला नाही. झेंडूच्या फुलांना केवळ ३० ते ४० रुपये प्रति किलो इतका भाव मिळाला.