परभणी: आर आर पेट्रोल पंप येथे सीएनजी भरताना दोन कारचा अपघात
परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील आर आर पेट्रोल पंप येथे सीएनजी भरण्यासाठी रांगेत असताना दोन कारचा अपघात झाल्याची घटना एक नोव्हेंबर सकाळी साडेसात वाजता घडली. या प्रकरणी दुपारी एकच्या सुमारास एका कारचालकावर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.