बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून या निवडणुकीत एमआयएम पक्षाचे सहा आमदार विजयी झाले आहेत. शुक्रवार दि. 14 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार एमआयएम पक्षाला मिळालेल्या या यशामुळे जालना जिल्ह्यातील एमआयएम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागांत फटाके फोडून जल्लोष केला. काही ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी मिरवणुकीच्या रूपात आनंद व्यक्त केला. विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकत्र येत घोषणाबाजी करत पक्षाच्या नेतृत्वाचा गौरव केला.