जालना जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅसचा गैरवापर आणि काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाने मोठी कारवाई करत 59 घरगुती सिलेंडर जप्त केले आहेत. शनिवार दि. 14 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितनुसार काल दिवसभरात व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅसचा वापर करणार्यावर प्रशासनाने ही छापेमारी केली असून ही छापेमारी अशीच सुरु राहणार असयाचे सांगण्यात.परंतु,जालना जिल्ह्यात मुबलक प्रमाणात गॅस उपलब्ध असुन नागरीकांनी विनाकारण धावपळ आणि गॅसचा काळाबाजार न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मित्तल यांनी केले.