भंडारा तालुक्यातील मंडणगाव येथील प्रफुल किशोर शेंडे (वय २४ वर्ष) या तरुणाने प्रेमसंबंधातून आलेल्या तणावामुळे राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना १८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, मृतक प्रफुल याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते व ते रिलेशनशिपमध्ये राहत होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून सदर तरुणीने त्याच्यासोबत राहण्यास व बोलण्यास नकार दिल्याने प्रफुल प्रचंड मानसिक तणावात होता.