अपघातात एका 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना विनायकराव पाटील महाविद्यालयाजवळ गुरुवार रोजी रात्रीच्या सुमारास घडली या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार भरधाव दुचाकी ट्रकला पाठीमागून धडकली या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळतात रुग्णवाहिका चालक वाहेद पठाण यांनी जखमेस रुग्णवाहिकेच्या मदतीने सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दाखल केले मात्र सदरील व्यक्तीस वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले.