सेलू: दहेगाव (गोसावी) येथे राष्ट्रीयकृत बँक शाखा स्थापन करण्याच्या मागणीला गती; लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर यांच्याकडून प्रतिसाद
Seloo, Wardha | Nov 7, 2025 तालुक्यातील दहेगाव गोसावी येथे राष्ट्रीयकृत बँक शाखा स्थापन करण्याच्या मागणीला गती मिळाली असून या संदर्भात अग्रेणी बँकिंग कार्यालय, वर्धा येथे महत्त्वाची बैठक पार पडली. तुळजापूर रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष रामकिशोर शिंगनधुपे व बहुजन रयत समितीचे अध्यक्ष अजय डोंगरे यांनी लीड डिस्टिक मॅनेजर चेतन शिरभाते यांची ता. ७ शुक्रवारला दुपारी १ वाजता भेट घेऊन दहेगाव येथे राष्ट्रीयकृत बँक शाखा सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.