धरणगाव: पकड वारंट बजावणाऱ्या 'एलसीबी' पथकावर खुनी हल्ला; गुंडाची पोलिसांशी धक्काबुक्की, गुजराल पेट्रोलपंपाजवळील घटना
पकड वारंट असलेल्या नितेश उर्फ गोल्या मिलिंद जाधव (रा. पिंप्राळा) याला पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाशी त्याने अरेरावी व धक्काबुक्की करीत धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्याने पोलिस उपनिरीक्षकांची कॉलरही पकडली. हा प्रकार रविवारी ४ जानेवारी रोजी रात्री गुजराल पेट्रोलपंपाजवळील एका हॉटेलमध्ये घडला.