लाखनी: लाखनीत अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; आरोपी अटकेत
भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतून घरी जात असताना आरोपी मुनेश्वर देऊळकर हा तिचा सतत पाठलाग करत होता. संधी साधून त्याने पीडितेला जबरदस्ती अत्याचार केला. याचदरम्यान, "कुणाला सांगितल्यास घरी येऊन गोंधळ घालेन" अशी धमकी देत पीडितेला गप्प बसवण्याचा प्रयत्न आरोपीने केला. मात्र धैर्य एकवटून पीडित विद्यार्थिनीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.