मुदखेड: जय जवान जय किसानचा नारा देत शेतकऱ्याने फोडली तहसीलदारांची गाडी;दिवाळी अंधारात गेली पण नुकसान भरपाई मिळाली नसल्याने संताप
Mudkhed, Nanded | Oct 27, 2025 जय जवान जय किसानचा नारा देत एका शेतकऱ्याने चक्क तहसीलदाराची गाडी फोडली आहे. हा प्रकार मुदखेड तहसीलदार कार्यालय येथे आज रोजी दुपारी सव्वा दोन वाजताच्या दरम्यान घडला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दिवाळी अंधारात गेली पण कुठलीच आर्थिक मदत शासनाकडून मिळाली नसल्याचे म्हणत शेतकऱ्याने मुदखेड तहसीलदारांची आज दुपारी गाडी फोडली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे त्यामध्ये मुदखेड तालुक्यातही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे परंतु अतिवृष्टीचे योग्य