कन्नड: पालकमंत्री शिरसाट यांची मस्ती आणि मुजोरीमुळे शेतकऱ्यांचा अपमान, कन्नड उपोषणावर अंबादास दानवे यांची संतप्त प्रतिक्रिया
मंत्री संजय शिरसाट यांनी शेतकऱ्याला आपल्या बंगल्यावर बोलावून उपोषण सोडण्यास भाग पाडल्याची चर्चा रंगली आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करून हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे.यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले, “ही सरकारची मस्ती आणि मुजोरी असून शेतकऱ्यांचा सरळ अपमान आहे.अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी आज दि २० ऑक्टोबर रोजी सांय पाच वाजता व्यक्त केली.