लाखांदूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रतीक उईके यांच्या चारचाकी वाहनाला भीषण अपघात झाला. चालत्या गाडीचा टायर अचानक फुटल्याने हा अपघात घडला. या घटनेत डॉ. उईके यांच्या एक्स.यु.व्ही. गाडीचे प्रचंड नुकसान झाले असले तरी, डॉ. उईके सुदैवाने यातून सुखरूप बचावले आहेत.