शेवगाव शहरात गुटख्यावर बंदी असताना मोठ्या प्रमाणात विक्रीचं चित्र दिसून येत आहे. बंदी असतानाही राजरोसपणे विक्री होत असल्याने गुटखामालक व प्रशासन यांच्यात काही आर्थिक देवाणघेवाण झाली आहे का असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत. किराणा दुकानामध्ये,टपऱ्यांवर सर्रास विक्री होतानाचे चित्र चिंताजनक आहे. अहिल्यानगर पोलीस अधीक्षक यांनी सूचना करूनही कारवाई होताना दिसत नाहीये.