विक्रमगड: जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा उपक्रमाचा शुभारंभ
छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा उपक्रम पालघर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी आमदार राजेंद्र गावित, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी विजया जाधव, वरिष्ठ अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.