घनसावंगी: गोदाकाठचा गावांतील शाळा, घरांसह दुकानांची साफसफाई
जायकवाडी प्रकल्पातून तीन लाख क्यूसेकहून अधिक पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले हाेते. त्यामुळे गत तीन दिवसांपासून घनसावंगी तालुक्यातील भादली, राजा टाकळी, गुंज, शिवनगावसह उक्कडगाव व इतर गावे पाण्याखाली गेली होती. सोमवारपासून पाणी ओसरत असून, गावांतील शाळांसह घरे, दुकानांत झालेला चिखल बाहेर काढण्यासाठी अनेकांची लगबग आहे.