रामटेक: राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वात सरपंच, उपसरपंच सह अनेकांचा शिवसेना प्रवेश
Ramtek, Nagpur | Oct 18, 2025 पक्ष संघटना मजबूत करणारा नेताच कार्यकर्त्यांना आवडत असतो.याच स्वरूपाचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल करीत आहेत. त्यांच्या या कार्यशैलीने प्रभावित होऊन त्यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दि. 18 ऑक्टोबरला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान रामटेक तालुक्यातील आदिवासीबहुल भागातील सरपंच, उपसरपंच सहित अनेक लोकांनी शिवसेनेत प्रवेश केला.