धुळे: देवपूरसह शहरातील विविध विकासकामांची आमदारांकडून पाहणी; कामांना गती देण्याच्या सूचना
Dhule, Dhule | Oct 20, 2025 धुळे शहराचे आमदार अनुपभैया अग्रवाल यांनी देवपूरमधील गार्डन, स्वामीनारायण मंदिराजवळील रस्ता, दीपस्तंभ, तसेच स्टेशन रोडवरील फुटपाथ आदी विकासकामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. या पाहणीवेळी भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, अभियंते व मनपाचे पदाधिकारी उपस्थित होते. ही कामे पूर्ण झाल्यानंतर शहराच्या सौंदर्यात आणि नागरी सुविधांमध्ये भर पडेल, असा विश्वास आमदार अग्रवाल यांनी व्यक्त केला.