लाखनी: भंडारा जिल्ह्यातील उमेद महिला बचत गटांना जिल्हा परिषदेतून मिळाली रोजगाराची संधी
दिवाळी सणाचा उत्साह सुरू असताना उमेद अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंना जिल्हा परिषद कार्यालयासमोर उभारलेल्या स्टॉलच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. या स्टॉलमध्ये महिलांनी घरगुती फराळ, लाडू, चकल्या, करंज्या, तसेच आकर्षक दिवे, सजावटीच्या वस्तू, कापडी पिशव्या आणि हस्तकला वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. दिवाळीचा सण जवळ आल्याने नागरिकांकडून या स्टॉलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून विक्रीतही वाढ दिसून येत आहे.