समुद्रपूर: मोहगाव येथे महसूल सप्ताहनिमित्त पांदन रस्त्यावर महसूल विभागाच्या वतीने वृक्ष लागवड
समुद्रपुर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने १ ते ७ ऑगस्ट महसूल सप्ताह साजरा करण्यात येत असून उपविभाग अधिकारी आकाश अवतरे, विलास नरवटे,तहसीलदार कपिल हाटकर यांच्या मार्गदर्शनात महसूल विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविल्या जात आहे.याच अनुषंगाने पर्यावरणाच्या दुष्टीने मोहगांव येथे तावी रस्त्या लगत असलेल्या पांदन रस्त्यावर वृक्षलागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला सरपंच विलास नवघरे,मंडल अधिकारी अधिकारी डि.एस. कापकर, अध्यक्ष अनिल धोटे आदी उपस्थित होते.