मुंबई: वडाळा भागात मोनो रेल मध्येच बंद पडली. त्यामुळे फायर ब्रिगेडला बोलवावं लागलं
Mumbai, Mumbai City | Sep 15, 2025
वडाळा भागात मोनो रेल मध्येच बंद पडली. त्यामुळे फायर ब्रिगेडला बोलवावं लागलं. फायर ब्रिगेडच्या जवानांनी अडकलेल्या लोकांना सुरक्षितरित्या मोनोरेल मधून बाहेर काढल. ही मोनोरेल चेंबूरच्या दिशेने जात असताना मध्येच बंद पडली. मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढणं एक कठीण टास्क आहे. कारण मोनोरेलचा ट्रॅक जमिनीलगत नाहीय.