आर्णी: शहरातील नदीकाठावरील पुरग्रस्तांना शासनाने द्यावा तात्काळ मदतीचा लाभ
Arni, Yavatmal | Oct 1, 2025 आर्णी शहरातील प्रभाग क्र. १० मधील नदीकाठ परिसरातील नागरिकांना वारंवार पुराचा फटका बसत असून नुकत्याच झालेल्या पुरामुळे घरे व उपजीविका धोक्यात आली आहे. गेल्या ४० ते ६० वर्षांपासून येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे रेड झोनमध्ये असल्याने त्यांना शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. २७ सप्टेंबर रोजी आलेल्या पुरामुळे परिसरातील घरे पाण्याखाली गेली असून मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने या नागरिकांना योग्य ती मदत तात्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मा