सावनेर: बडेगाव येथे भारतीय जनता पार्टीचे सविस्तर आढावा बैठकीचे आयोजन
Savner, Nagpur | Nov 6, 2025 आज दिनांक ०६ नोव्हेंबर २०२५ रोजी बडेगाव येथे जिल्हा परिषद निवडणूक २०२५ अनुषंगाने भारतीय जनता पार्टीची सविस्तर आढावा बैठक पार पडली. बैठकीत आगामी निवडणुकीसंदर्भातील नियोजन, बूथस्तरावरील संघटनात्मक बळकटीकरण, कार्यकर्त्यांची जबाबदारी, मतदार संपर्क मोहीम तसेच जनसंपर्क उपक्रम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.या वेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर कुंभारे, तसेच श्री. अशोक धोटे, श्री. विजय देशमुख, श्री. धनराज भोयर उपस्थित होते