यवतमाळ: जिल्ह्यात तापमानामध्ये घट,यवतमाळचा पारा 11.4 अंशावर
थंडीची चाहूल लागताच यवतमाळ जिल्ह्यातील तापमानामध्ये घट होण्यास सुरुवात झाली आहे 11 नोव्हेंबरला यवतमाळचा पारा 11.4 अंशापर्यंत खाली आला होता. नोव्हेंबर महिन्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद 11 नोव्हेंबरला घेण्यात आली. या तापमानामध्ये आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडण्याची दाट शक्यता आहे.