उमरखेड: खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा उमरखेड तालुक्यातील सुकळी व शहरामध्ये पूरग्रस्त लोकांच्या भेटी घेऊन सांत्वन
मागील एक महिन्यापासून होणाऱ्या सतत अतिवृष्टीमुळे उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी घुसल्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झालेली आहे. घरांच्या पडझडी झालेले आहेत बऱ्याचश्या घरामध्ये पाणी गेलेले आहे उमरखेड शहरांमध्ये सुद्धा काही भागांमध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊन प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची आज खासदार नागेश पाटील यांनी पाहणी करून प्रशासनास सूचना दिल्या.