नरखेड: तहसील कार्यालय नरखेड येथे शेतकऱ्यांचा एल्गार, सोयाबीनची झाडे घेऊन शेतकरी पोहोचले तहसील कार्यालयात
Narkhed, Nagpur | Sep 23, 2025 तहसील कार्यालयात आज शेतकऱ्यांनी संत्रा मोसंबी फळगळ भरपाई सोयाबीन पिकावर पडलेल्या रोगामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तसेच वाढते विज बिल व कपाट करण्यात आलेल्या लाडक्या बहिणी तसेच 2024 च्या पिक विमा तात्काळ देण्यात यावा यासारख्या विविध मागण्यांना घेऊन निवेदन दिले. यादरम्यान शेतकऱ्यांनी चक्क सोयाबीन वर रोग पडलेली झाडे घेऊन स्थानीय प्रशासनासमोर आपला आक्रोश व्यक्त केला