विक्रमगड: कुर्झे येथे पोलिसांवर ग्रामस्थांचा हल्ला; घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
पालघर जिल्ह्यातील कुर्झे येथे ग्रामस्थांनी पोलिसांवर हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खवाडा विद्युत प्रकल्पाशी संबंधित वाहने ग्रामस्थांनी रोखून धरले पोलिसांनी विनंती केल्यानंतर देखील ग्रामस्थांनी रस्ता मोकळा करून देण्यास नकार दिला. यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांमध्ये वाद झाला आणि ग्रामस्थांनी थेट पोलिसांवरच हल्ला चढवला. संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ व्हायरल झाला आहे.