हिंगणघाट: शहरात गांज्याची विक्री करणारी महिला व तिचा अल्पवयीन मुलगा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
हिंगणघाट शहरात गांज्याची विक्री करणाऱ्या नंदोरी रोड वरील रहिवासी महिला व तिचा अल्पवयीन मुलगा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली असून त्यांच्या ताब्यातून ७१ हजार ७६० रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.वर्धा येथिल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक पेट्रोलिंग करीत असताना पथकाला पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळताच पथकाने नंदोरी रोडवरील महिलेच्या घरी एन.डि.पी.एस. कायद्यान्वये रेड केला असता,