यवतमाळ: शहरातील महाजनवाडी मेन लाईन रोड येथील हार्डवेअरच्या दुकानात चोरी
यवतमाळ शहरातील महाजनवाडी मेन लाईन रोड येथील युनायटेड ट्रेडर्स दुकान फोडून अज्ञात चोरट्याने दुकानांमधील 64 हजार 50 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याची घटना 5 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबरच्या दरम्यान घडली आहे. सदर घटनेप्रकरणी दुकान मालक जाहीद बॉम्बेवाला यांच्या फिर्यादीवरून 7 ऑक्टोबर रोजी शहर पोलीस ठाणे मध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.