मोहाडी: चिखली येथे कुलूपबंद घरात धाडसी चोरी, २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
गोबरवाही पोलीस ठाणे हद्दीतील मौजा चिखली येथे कुलूपबंद घरात धाडसी चोरी झाल्याची घटना दि. 30 नोव्हेंबर रोज रविवारला सायं.6 वा.च्या सुमारास उघडकीस आली. फुलवंता लक्ष्मण गजाम असे घरमालक महिलेचे नाव असून सदर महिला दि. 21 नोव्हेंबरला काही कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेली असता अज्ञात आरोपींनी घरातील कुलूप तोडून लोखंडी कपाटात ठेवलेली सोन्याची अंगठी असा एकूण 22 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.