आज उमरेड येथे पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने पदवीधर मतदार नोंदणी आढावा बैठक यशस्वीपणे संपन्न झाली.यावेळी माजी आमदार सुधीर पारवे प्रामुख्याने उपस्थित होते.या बैठकीत पदवीधर नोंदणी प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेऊन पुढील कार्ययोजना निश्चित करण्यात आली. याप्रसंगी मतदार नोंदणी प्रमुख सुधाकर कोहळे, सहप्रमुख सुधीर दिवे,राजू पारवे जिल्हाध्यक्ष आनंद राऊत, राजीव पोतदार व इतर भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.