हिंगणघाट: श्रीराम सिटी सातेफळ रोडवरील घरातून अज्ञात चोरट्याने पळविले नगदिसह १ लाख २३ हजार ३७४ रुपये किमतीचे ऐवज
हिंगणघाट शहरातील श्रीराम सिटी सातेफळ रोडवरील घरातून अज्ञात चोरट्याने कुलूपबंद घरातून नगदिसह १ लाख २३ हजार ३७४ रुपये किमतीचे ऐवज चोरून नेल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.प्राप्त माहितीनुसार रविंद लाकडे हे घराला कुलूप लावून कुटुंबासह येणोरा गावाला गेले होते.१४ ऑक्टोबर सकाळी ८ वाजता ते घरी गेले असता त्यांना घराच्या मुख्य द्वाराचे कुलूप तुटून दिसले त्यांनी घरात प्रवेश केला असता त्यांना हॉलमध्ये असलेल्या कपाटातील सामायन अस्ताव्यस्त पडून दिसले त्यांनी बेडरूम मध्ये बघितले.