गोंदिया: नगरपंचायत निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगाने सभापती निवास येथे भाजप पक्षाची महत्वपूर्ण बैठक संपन्न
आगामी निवडणुकीचा व
गोरेगाव नगरपंचायत निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.आगामी निवडणुकीचा विचार करता संघटना मजबुतीकरण,बूथ सशक्तीकरण,मतदारांशी थेट संवाद या विषयांवर सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी भाजपच्या जिल्हाध्यक्ष सीता रंहागडाले,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर,माजी आमदार खोमेशभाऊ रंहागडाले,माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार,माजी बांधकाम सभापती हिरालाल रंहागडाले, पंचायत समितीचे उपसभापती रामेश्वर महारवाडे उपस्थित होते.