सेलू: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा केळझर येथून शुभारंभ; सेलू पंचायत समितीचे अधिकारी राहणार उपस्थित
Seloo, Wardha | Sep 16, 2025 राज्य शासनाने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ बुधवारी (दि. १७) ला सेलू पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या केळझर येथून होत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसरातील सभागृहात करण्यात आले असून, यावेळी पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, उमेद संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. अशी माहिती ता. १६ ला दुपारी १२.३० वाजता गटविकास अधिकारी पाणबुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.