पारंपरिक रित्या पुरुषांचा खेळ समजला जाणाऱ्या बैलगाडा शर्यतीत आता मुलींनीही बाजी मारली आहे. लोणी बुद्रुक येथे म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत मुलींच्या अनपेक्षित सहभागाने ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले.केवळ सहभागापुरते मर्यादित न राहता या मुलींनी कौतुकास्पद कामगिरी करत पारितोषिकही पटकवले.