साकळी या गावात अक्सा नगर आहे. या नगरात रुबीनाबी शेख आरिफ वय २३ ही महिला भाच्याला बोलली की नसरीन शेख यांच्याकडे जेवणाला जाऊ नको त्यांचे आपले भांडण झाले आहे. अशा बोलण्याच्या रागातून महिलेला साबीर शेख, नसरीन शेख, रफिया शेख व शमीम शेख या चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तेव्हा या चार जनाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे