खटाव तालुक्यातील गिरिजा शंकर वाडी येथे बाबासाहेब थोरवे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून योग्य व निष्पक्ष तपास होत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही अद्याप संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त करत थोरवे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरोपींवर तात्काळ कारवाई न झाल्यास भविष्यात पुन्हा अशा प्रकारचा हल्ला होण्याची शक्यता असून, केवळ आपल्याच नव्हे तर इतर नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणातील संबंधित व्यक्तींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी ठाम मागणी केली.