उदगीर: बंजारा समाजाने वयोवृद्ध महिलेचा अंत्यसंस्कार करण्यासाठी कासराळ ग्रामपंचायती समोर रचले सरण, दयानंद आडे
Udgir, Latur | Oct 31, 2025 उदगीर तालुक्यातील कासराळ येथे बंजारा समाजाची वयोवृध्द महिला चंदरबाई रेवा पवार यांचे दुःख निधन झाले त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी बंजारा समाजाला दिलेल्या स्मशान भूमीच्या जागेत बंजारा समाजाने ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी लाकडे टाकत असताना मागासवर्गीय लोकांनी त्यांना विरोध केला,त्यामुळे संतापलेल्या बंजारा समाजाने चक्क ग्रामपंचायती समोर नेऊन लाकडे टाकून सरण रचले, ग्रामपंचायतीने हक्काची स्मशान भूमीची जागा देऊनही अंत्यविधी करू देत नसल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे